व्यायामाने जसे शरीर सुदृढ सशक्त आणि निरोगी बनते. तसे वाचनाने मन सुसंस्कॄत, समर्थ आणि संपन्न बनते. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या वाढदिवशी १५ ऑक्टोबर. आपण ’वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करतो. वाचनाचे महत्त्व मी आपणास यातून सांगणार आहे.
ज्या वाचनामूळे चारित्र्य सदगुणरुपी संपत्ति, ज्ञान-विज्ञान त्याप्रमाणे उत्साह वाढतो, ते वाचन हितकारक असते. अद्ययावत ज्ञानासाठी वृत्तपत्र वाचावे. सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचन उपकारक असते.विद्यार्थ्याने इतर गोष्टीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा वाचनाचा आश्रय घ्यावा.वाचन बालपणी ज्ञान देणारे तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करणारे आणि म्हातारपणी दु:ख घालवणारे असते. चांगल्या ग्रंथाचे वाचन हितकारक असते.